Wednesday, January 25, 2012

'लिव्ह-इन रिलेशनशीप' हा ज्येष्ठांसाठी सवोर्त्तम पर्याय

'लिव्ह इन रिलेशनशीप'बद्दल आपल्याकडे आज चर्चा होत असली तरी परदेशात हा खूप जुना ट्रेण्ड आहे. भारतात मात्र सक्तीने लग्न करावं लागतं. आपल्याशी सूर न जुळलेल्या, कोणत्याही जबाबदाऱ्या न घेणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहण्यास भाग पाडलं जातं. आजची पिढी त्या तुलनेत सुदैवी म्हणावी लागेल. त्यांना नातेसंबंध, संस्कृती अशा कोणत्याही गोष्टींचं ओझं न बाळगता हव्या त्या व्यक्तीबरोबर राहण्याचं स्वातंत्र्य मिळतं.

ह्या'लिव्ह इन रिलेशनशीप'बद्दलचे स्वांतत्र्य आपल्या ज्येष्ठ मडंळीना देण्यासाठी समाजाने आपला दृष्टीकोन बदलायला हवा. मन रमवावे असे छंद किंवा मित्रांचे वर्तुळ प्रत्येकाकडे असतेच असे नव्हे. अशा वेळी तो किंवा ती एकटी असेल, जोडीदाराचे निधन झालेले असेल, तर एकटेपणा खायला उठतो.एकाकी व आजारी ज्येष्ठाना पाहिण्यास समाजाला व त्याचा नातेवाईकाना वेळ नसल्याने ही मडंळी त्रास सहन करीत असतात.अनेकांची मुले नोकरी वा व्यवसायानिमित्त देशाबाहेर असतात. त्यातच पतीचे वा पत्नीचे निधन झाल्यानंतर अनेकांना एकाकीजीवन जगावे लागते. अशावेळी आयुष्याच्या उत्तरार्धात कोणाची तरी हक्काची साथ मिळावी. त्याना आयुष्याच्या शेवटच्या पर्वात कोणातरी मदतीची साथ लागते.ती साथ त्याना या 'लिव्ह इन रिलेशनशीप'मघुन मिळाली तर  समाजाला काय  अडचण होईल?

लिव्ह-इन-रिलेशनशीपकडे संशयाच्या नजरेने पाहण्याकडेच अगदी ज्येष्ठांचाही कल असतो.मात्र उतारवयात फक्त आपल्या एकाकीपणाची सोबत उरल्यावर लिव्ह-इन-रिलेशनशीपचा हाच नकोसा पर्याय या ज्येष्ठाना किती दिलासादायक ठरु शकतो. सिनिअर सिटीझन्सना, एकाकीपणामध्ये सोबत मिळावी म्हणून 'ज्येष्ठांचे लिव्ह इन रिलेशनशीप मंडळ' ही संकल्पना ज्येष्ठाना आधार देणारी ठरेल.कितीतरी एकटेच ज्येष्ठ आपल्या साथ शोधत असतात पण आपला समाज त्याना अशा  सबंधासाठी परवानगी देईल का? पण या ज्येष्ठाना परवानगी देउन सुसंस्कृत समाजात अशी नाती स्वीकारले पाहिजे.एकाकी ज्येष्ठाने जोडीदार निवडल्यास समाजमान्यता मिळायला हवी.

आयुष्यभर जोडीदाराच्या साथीने वाटचाल करत असतानाच उतारवयात परिस्थितीने आलेले एकाकीपण कुढत काढण्यापेक्षा समवयस्क जोडीदाराच्या साथीने ते अधिक सुखकर करण्याची संधी मिळावी; तसेच लग्नासारख्या सोपस्कारांमध्ये या वयात न अडकता हे सहजीवन अनुभवता यावे, हा विचार करुन नागपूरमध्ये ज्येष्ठांसाठी लिव्ह इन रिलेशनशीप मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. अशा विचारांचे सामाजाने स्वागत केले पाहिजे. 

विवाहांमधून मालमत्ता, वारसाहक्क अशा अनेक समस्या उभ्या राहतात. अशा वेळी 'लिव्ह-इन रिलेशनशीप' हा सवोर्त्तम पर्याय आहे. बंधनांचे ओझे नाही किंवा कर्तव्यांचा काच नाही. आहे ते एकमेकांना कंपनी देणे व उत्तरायुष्य सुखकर करणे. कोणत्याही क्षणी नात्यातून बाहेर पडण्याची सोयही यात आहे.

ज्येष्ठाना आपल्या शेवटच्या प्रवासात या रिलेशनशीपचा त्रास होताही कामा नये.अशा योजना समाजाने यांच्यासाठी आणल्यास त्या योजनांचे स्वागतच होईल.

1 comment:

Anonymous said...

kharach vichar padato ki apan lagna ka karato ?sur julanyasathi,jababdarisathi ki apali sanskruti. utarvayat kinva konatyavi vayat apan ekate asatana apalyala fakta opposite sex chi ch jarurat asu shakate ka.?apan yetaparyant yet asatana kahich rujavaleli nati nasatat ka?ekate vatat asale tar aajparyantache channd vyasang je apure rahile te purey karu shakato konachya tari sathine athava ekatine .tarun vayat jase julavun ghenyachi kshamata asate tashi utarvayat asu shakate ka?utarvayat sevashrushasathi jodira tar shodat nastil na? mag parat manasik kuchabana.apalya bharatiya sanskrutit erasing memory la jaga nahi. apan kayam katibadha asato natesambhdhala, teva kase jamel live in relation madhe? apalya kalachya padadya aad gelelya jodidharsobad ghalvalele tey kshan erasing mamory madhe upload karata yetil? tevha tarun asatana apali mananari konatahi nati evadi mulasakat ghatt karayachi tich vyajasakat muddal parat karatil .puna utarvayat ,tarun vayatil vadhuparikshechya bhangadit padun agitun alo phofatyat padalo karayache.nahi ka?baki jodi julvayachi varachya hatat ?