Wednesday, February 8, 2012

निवडणुक प्रक्रियेला पर्याय शोधा.

                 देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकाप्रतिनिधीची निवड पारंपारिक निवडणुकीच्या  पध्दतीने होत आली आहे.या कार्यक्रमात मतदानपत्रिका जाऊन त्याजागीमतदान यंत्र आले..एवढाच काय तो बदल या पक्रियेत झाला आहे. पण हल्ली देशातील कोणत्याही निवडणुकीतून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर वाढल्याने या पध्दतीत बदल करणे गरजेचे झाले आहे.
                 
      सत्ताधारी पक्ष निवडणुक आयोगाच्या मदतीने आपल्याला योग्य असलेला  मतदानाचा दिवस ठरवला आहे.राजकिय  पक्षाला पैसे दिले तरच उमेदवारी  मिळते किंवा नातेवाईकाना बहाल केली जाते. निवडणुका जिकंण्यासाठी, पाहिजे तो विभाग मिळविण्यासाठी व नतंर प्रचारासाठी प्रचंड पैसा ओतला  जातो.मोठे नेते व प्रतिष्टित लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या मजबुतीसाठी  पैशाने फोडले जातात.उद्योजक व विकासक आपल्या पक्षाच्या यशासाठी व  आपल्या स्वत:च्या हितासाठी पैसा ओततात.मतदानाच्या दिवशी मतांसाठी मतदाराना  पैसा वाटला जातो.पराभुत दुस-या पक्षाना खिजवण्यासाठी विजयी मिरवणुकीवरही पैसा खर्च केला जातो.शेवटी मोठे पद मिळवण्य़ासाठी पैसा लागतोच.निवडणुकीवर केलेला पैसा मग वसुलीसाठी लोकप्रतिनिधी कामाला लागतात.इथेच भ्रष्टाचार सुरु होतो.भ्रष्टाचार केल्याशिवाय तो निवडणुकीवर खर्च केलेला पैसा वसुल करु शकत नाही.या निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रचंड पैशाची उधळपट्टी होते. या लोकप्रतिनिधीनी समाजकरणाचा एक व्यवसाय केला आहे. पैसे टाकायचे व नतंर सत्ता मिळाल्यास खर्चे केलेल्या   शंभर पट्टीत वसुली करीत पुढच्या पिढिशी मालमत्ता करुन ठेवायची. तसेच या प्रक्रियेत वेगवेगळे लहान मोठे वाईट धंदे होते असतात.



            निवडणुक आयोगाची पाळत  असुनही गैरमार्गाने निवडणुकीच्या प्रक्रियेवर पैशाचा वापर वाढला आहे. या पध्दतीने लोभी व स्वार्थी लोकप्रतिनिधी देशाच्या लोकशाहीला मिळत असल्याने  आपल्या निवडणुक प्रक्रियेला पर्याय गरजेचे झाले आहे. प्रचंड पैसा सामान्य समाजसेवककडे नसल्याने तो या निवडनुक़ीच्या प्रक्रियेकडे वळतच नसल्याने राजकरण सच्चा समाजसेवक येत नाहीत.लोकशाहीला प्रबळ बनविण्य़ासाठी आपल्या निवडणुक प्रक्रियेला पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे.


               सत्ता काबीज करण्यासाठी निवडणुकीच्या मार्गाचा अवलंब लोकप्रतिनिधी करत असल्याने हा निवडनुकीचा जुनी पध्दत बदलावी.जुनी पध्दत रद्द करुन अशी नवीन पध्दत आखली पाहिजे की कमीत कमी पैशाचा वापर करुन योग्य लोकप्रतिनिधी निवडता यावा.  

No comments: