Sunday, February 12, 2012

काळा घोडा उत्सव



'काळा घोडा फेस्टिव्हल' म्हणजे  कलाप्रेमींची पर्वणी.






















काही वर्षांपासून 'काळा घोडा फेस्टिव्हल' मुंबईकरांसाठी खास आकर्षण ठरला आहे.
























मुबंईत टाइम्स ऑफ इंडिया काळा घोडा फेस्टिव्हल आयोजित करते.






















द टाइम्स ऑफ इंडिया काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल, २०१२'ची धूम शनिवार ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली.























१९९९पासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलचे यंदाचे १४वे वर्ष होते.आजचा शेवटचा तुफ़ान गर्दीत साजरा झाला.

























संगीत, नृत्य, नाटक, साहित्य, चित्रपट, खाद्यसंस्कृती या सर्वांची लज्जतदार मेजवानी ही या फेस्टिव्हलची खासियत असते.

























कला प्रेमी आर्वजुन या उत्सवाला भेट देतात व एकामेकालाही भेटातात.


























यावर्षी या फेस्टिव्हलमध्ये जुन्या आणि नव्या कलांचा अनोखा संगम पाहावयास मिळला.























यावेळी कला आणि संस्कृतीचे विस्तृत दर्शन घडणार असून नऊ दिवसांत ४००हून इव्हेंट्स झाले.

























देशभरातील विविध शहरांमधून हजारो लोक दरवर्षी या फेस्टिव्हलला भेट देतात.


























यानिमित्ताने दरवर्षी  संपूर्ण मुंबईकरांना ख-या अर्थाने कलेचा अस्वाद घेता येतो.



























थ्रीडी ईमेजचे सादरीकरण,फूड आर्टस,म्युझिक आणि डान्स शो, चित्रपट विभागातर्फे स्पर्धा,दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत चर्चासत्रे,नाटक, लहान मुलांसाठी खेळ, पर्यावरणविषयक मार्गदर्शन, कचरा व्यवस्थापन असे उपक्रम सादर केले जातात.


























मुंबई टाइम्स टीम संस्कृत भाषेत प्रसिद्ध होणारा पेपर...१८८१ सालचा 'केसरी'...असे एकाहून एक दुर्मिळ पेपर्स पाहण्याची संधी यंदाच्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये मिळला.























उदंड उत्साह, तरुणाईचा जल्लोष, बच्चे  कंपनीचा चिवचिवाट आणि कलाप्रेमी मंडळींचा सहभाग वाढत आहे.
























डेव्हिड ससून लायब्ररीसमोरील चौकाला ज्याच्यामुळे 'काळा  घोडा' हे नाव मिळाले आहे.





No comments: