Tuesday, February 28, 2012

२९ फेब्रुवारी



२९ फेब्रुवारी हा विशेष दिवस चार वर्षातुन एकदाच येतो.





बुधवार, २९ फेब्रुवारी २०१२ फाल्गुन शुक्ल ७ शके १९३३;




भारतीय सौर फाल्गुन ९, शके १९३३













ज्या वर्षात फेबुवारी महिन्यामध्ये २९ दिवस असतात, त्या वर्षाला लीप इयर म्हणतात. त्यामुळे ते एरव्हीच्या ३६५ दिवसांपेक्षा जास्त म्हणजे ३६६ दिवसांचे असते.






पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस, पाच तास, ४८ मिनिटं आणि ४६ सेकंद लागतात. त्यानुसार 'सौरवर्ष' ग्राह्य धरले जाते. या सौरवर्षात येणा-या ३६५ आणि पाव दिवसाचं गणित जमवण्यासाठी चार वर्षांनंतर एकदा एक लीप इयर येते. बाकी वर्षांत ३६५ दिवसांचं गणित व्यवस्थित जमवायचं झाल्यास चार वर्षांतून एकदा लीप इयर येणे स्वाभाविक आहे.




आपला वाढदिवस दरवर्षी येतो,लीप इयरमुळे चार वर्षांतून एकदाच वाढदिवस कौतुक जरा जास्तच होते.


दर चार वर्षांनी येणारा दिवस या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती आणि त्यांचे आप्तमित्र यांच्यासाठी स्पेशल सेलिब्रेशनचा असतो.


हा दिवस चार वर्षानी येत असल्याने महत्वाची कामे आयोजित केला जात नाहीत.पण लक्षात राहणारा हा दिवस आहे.


भारतरत्न मोरारजी देसाई यांचा जन्मदिन २९ फेब्रुवारी,१८९६.

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष २९ फेब्रुवारी. प्लुप्तवर्ष दिन.

2 comments:

Mr.Guest said...
This comment has been removed by the author.
VIVEK TAVATE said...

दिलेल्या बद्द्ल आभारी आहे.