Monday, April 23, 2012

आईचे नाव पहिले

जन्माचा दाखला तयार करताना, इतकी वर्ष फक्त बालकाच्या वडीलांचे नाव असायचे. नंतर, त्यात आईच्या नावाचा समावेश झाला.दाखल्यावर आईचे नाव आधी टाकावे आणि नंतर, वडीलांचे असा प्रस्ताव विचारार्थ आहे. मुंबई विद्यापिठाने पदवी परीक्षेच्या प्रमाणपत्रात विद्यार्थ्याच्या नांवासह त्याच्या आईचे नाव छापण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्याचे आडनाव,त्यानंतर त्यांचे नाव,वडिलांचे नाव आणि मग आईचे नाव असते.एक चागंली पध्दत सुरु केली आहे. चित्रकार,कवी,लेखक आपल्या कलाकृतींवर आपली नावे लावतात.पण जन्मदाती आई आपल्या मुलांला आपले नाव लावत नाही.

उत्तर भारतात मुलं वडिलांचे नाव लावतच नाहीत. खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावात वडिलांचे नाव नाही. केवळ महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत प्रामुख्याने वडिलांचे नाव लावण्याची पद्घत आहे.दक्षिण भारतात नाव लिहिण्याची पद्घत फारच वेगळी आहे.नाव कोणाचे लावावे आणि पालक कोण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत.त्यातही वडिलांचं नाव आधी लावावं की आईचं हा आणखी वेगळा विषय. मुलाचे पालनपोषण करण्याची प्रामुख्याने जबाबदारी आईची असल्यामुळे तिच्या नावाला प्राधान्य दिले जावे.

वैविध्याने नटलेल्या भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांत नाव लिहिण्यात विविधता आढळते.भारतात कोणी कसे नाव लावावे हे सांगणारा कायदा भारतात नाही.पण जन्मदात्या आईचे नाव आपल्या नावांत वडिलांच्या अगोदर लावण्याचा कायदा करावा.

सर्व कार्यालयीन कामकाज आणि कागदपत्रांमध्ये मुख्य पालक म्हणून वडिलांऐवजी आईचे नाव लिहिले जावे, अशी शिफारस नियोजन आयोगाच्या कृती गटाने नुकतीच केली आहे. त्यादृष्टीने कायद्यात बदल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय.मात्र पालक म्हणून आईचे नाव आधी लिहावे की वडिलांचे हा मुद्दा चर्चीला जात आहे. पालक म्हणून वडीलांना जे हक्क असतात तेच आईलाही असणे आवश्यक आहे. त्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करावेत.


हिंदू कायद्यानुसार कागदपत्रांवर प्रथम पालक म्हणून वडिलांचे नाव असते.पण रस्त्यावर सापडलेल्या मुलाचा सांभाळ एखादी व्यक्ती करत असेल तर,ती वास्तविक पालक ठरते कारण त्या मुलाची काळजी ती घेत असते.तसेच पालक म्हणून आईला वडिलांच्या बरोबरीने अधिकार मिळालेच पाहिजेत.हे कायद्याला मान्य आहे.जन्मानतंर मुलाची काळजी घेणारी पहिली आईच असते. तसेच मुलांचा अभ्यास, त्यांचे आजारपण, त्यांचे औषधपाणी आईच करते आणि मुलं तिच्यावरच अवलंबून असतात. आई आणि मुलांची अटॅचमेंट असते. म्हणुन आईचे महत्व हिरावुन न घेता आईचे नाव देउन आईचा सन्मान करावा.याला कोणाचा विरोध नसेल.

मुलाच्या शाळेच्या प्रवेश अर्जावर पहिले पालक म्हणून वडीलांचे नाव असते. तेथे किंवा अधिकृत नोंदींमध्येही आईचे नाव,वडीलांच्या नावाबरोबर असावे.तसेच पालक म्हणून वडीलांच्या सहीबरोबर आईचीही सही आवश्यक ठरवावी.

महिलांचे समाजातील स्थान उंचावण्याची आणि त्यांचे हक्क त्यांना देण्याची ही मोहीम आहे.प्रुरुष व महिला यांच्यात समानता आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.याने कोणाच्या अधिकार डावळण्याचा विचार नाही.त्यामुळे प्रुरुषाने नारज न होता या नविन पध्दतीचे स्वागत करावे.महिलांना त्यांच्या मुलांच्या पालकत्वाचा समान अधिकार देण्यात यावा.
 
समाजाच्या विचारसरणीत हा बदल घडला पाहिजे.बदलाला थोडा वेळ लागेल पण हा बदल स्वागतार्ह आहे.

3 comments:

Anjali said...

khupch chan vichar aahe.... satyat yayala hava

Anjali said...

khup chan prastaw aahe....satyat yayla hava

Anjali said...

prastaw khupch chan aahe...satyay yayla hava.....