Saturday, August 11, 2012

दहिहंडीची बदलती संस्कृती

कृष्णाच्या बाललिलांनी सजलेला उत्सव म्हणजे दहिहंडी.‘गोविंदा आला रे’ अशी हाळी देत गल्लोगल्लीच्या दहिहंडय़ा फोडण्यासाठी दाखल झालेल्या जवळपास ८०० गोविंदा पथकांमधील सुमारे दीड लाख गोविंदांनी रचलेल्या मानवी मनोऱ्यांचे थरार अनुभवत मुंबईकर थक्क झाला.

हा उत्सव पुर्वापार चालत आला आहे. पण आता आता त्याला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त होत आहे.हल्ली दहिहंडीला बाजारी स्पर्धेचे स्वरूप आले आहे.दहिहंडी खूप छान उत्सव आहे पण राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे दहीहंडी फोडणा-या तरूणांच्या जीवाचा खेळ मांडला जातो.दहिहंडी हा उत्सव म्हणूनच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका.

अशक्यप्राय असलेले धाडस करण्याचे आव्हान देत त्यावर लाखो रुपयांची बक्षिसे लावायची आणि त्यासाठी गोविंदा पथकांना झुलवत ठेवायचे.हे आयोजकानी योजलेले आहे.पैशाच्या आमिषापोटी उंचच उंच दहिहंडी फोडण्याच्या नादात कधी गोविंदा कायमचे अपंगत्व येत आहे.याची आयोजकांनी विचार करायला पाहिजे.यावर्षी दहीहंडीच्या उन्मादात तीन ठार तर ३५० जखमी झालेल्याची नोंद झाली.मुंबईत जवळपास २२५ गोविंदा, ठाण्यात २७ व नवी मुंबईतही २७ आणि राज्यभरात ७० असे सुमारे ३५० गोविंदा जखमी झाले.

ट्राफिक जाम केली. प्रचंड कचरा केलाय.रात्री दारू पिऊन तमाशे करतात ते वेगळे. मोकळ्या मैदानात व्यवस्थित नियमानुसार सुरक्षेची साधने जवळ ठेवून मग गोविंदा करायला हवा.

या सणाचा दुरुपयोग गोविंदांच्या जीवाशी खेळून स्वत:च्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्यास लोकप्रतिनिधींकडून केला जातो.कार्यर्कत्यांनी पदरमोड करून काढलेल्या वर्गणीतून उत्साहाने दहीहंडीचे आयोजन होत नाही. हा उत्सव नेत्यांच्या आणि अमाप पैसेवाल्या लोकांच्या ताब्यात गेला आहे.आज हा आनंद-उत्सव न होता एकप्रकारे उंच मनो-यांची स्पर्धा म्हणून त्याकडे पाहिले जाते. उत्सवाचे रूपांतर चुकीच्या वळणावर आहे. 

कालच्या सणात अक्षयकुमार, महिमा चौधरी, इम्रान हाश्मी, रेशम टिपणीस, भार्गवी चिरमुले, सोनाली कुलकर्णी, राहुल सक्सेना, आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, महेश मांजरेकर, सारा श्रवण, सुनील पाल, चंकी पांडे, अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, राखी सावंतपासून हिंदी व माराठी चित्रपट सृष्टीतील तारे-तारका आपल्या अदा दाखवत होते.

ह्या सिने कलाकार या सणात कशासाठी आणले जातात.बिचारे गोविंदा उंचच्या उंच मानवी मनोरे लावतात पण प्रेक्षक या कलाकाराना भाव देतात व त्यांची अदाकारी पाहण्यात गुंतलेले असतात.डीजेची धूम आणि नेत्यांची छबी असलेले अतिप्रचंड होर्डिग्ज या वातावरणात पैशांचे थर लागत होते.गेल्या काही वर्षांमध्ये गोविंदामध्ये मोठय़ा प्रमाणात ‘दौलतजादा’ होत असून राजकारणी व राजकीय पक्षांकडे गोविंदासाठी कोटी कोटी रुपयांचे थर उभे राहातात कोठून असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

आर्थिक मंदीमुळे आणि महागाईच्या झळांनी होरपळलेल्या सामान्य मुंबईकराचे डोळे आजच्या झगमगाटामुळे दिपून गेले, आणि कालपरवापर्यंत संस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘गोपाळ काला’ आता ‘उत्सव’ राहिला नाही, तर एक ‘इव्हेन्ट’ झाला आहे.

गोपाळांना दिलेले बनियन या सर्वांवर गोपाळांसोबत राजकारण्यांचे फोटो झळकू लागले. पैशाच्या चढाओढीने कहर केला आणि संस्कृतीची विकृती झाली.राजकारण्यांनी स्वत:च स्वत:वर बंधने घालून त्याचे विडंबन थांबवावे. मात्र, प्रसिद्धीचा हव्यास बाळगणारे नेते एवढा त्याग करतील याची शक्यता नाही.आयोजक तर दिवसभर डीजे लावून उंच दहीहंडी बांधून गोविंदांना खेळवतात. दिवसभर राजकारणी मिरवून घेतात व सायंकाळी सेटलमेंट करून जवळच्या मंडळांकडून थर कमी करून फोडून घेतात. म्हणून हंडी उंच बांधण्यावर निर्बंध हवेत. 


दहीहंडी  सुरक्षित असावी.