Sunday, March 31, 2013

सेलिब्रिटीना मान कशाला?



            सोसायटीतला महिला सगळ्याजणी एका कार्यक्रमाला गेल्या होत्या.त्या कार्यक्रमासारखा कार्यक्रम आमच्या सोसायटी सुरु करायचा असल्याने कार्यक्रम पाहायला गेल्या होत्या.तेथे महिलांची टीव्ही चँनलवरच्या मालिकांमघल्या कलाकारांशी भेट घडली.थोडासा परीचय व थोडक्यात गप्पा आटोपल्या.काही महिलांना मोठा आनंद झाला.त्यानी त्यांच्यासोबत फोटो काढले.सेलिब्रिटीचा मान मिळाला.कलाकार छोटे असतात पण एकाद्या मालिकेने त्याना  सेलिब्रिटीचा मान मिळतो.टीव्हीवर झळकला कि लगेच तो सेलिब्रिटी होतो.पण एखादा खुपशी पुस्तके लिहिणारा लेखक,प्रसिध्द चित्रकार,पत्रकार,करोडो रुपयाचा व्यापार करणारा व्यापारी,समाजसेवक आणि अगदी एकाद्या पक्षाचा मोठा कार्यकत्यांना कधीच सेलिब्रिटीचा मान मिळत नाही.पत्रकार पत्रकारीता करीत असतात पण जेव्हा ते टीव्हीवरच्या न्युजचँनलच्या कार्यक्रामात दिसतात तेव्हा  लगेच  ते सेलिब्रिटी होतात.शास्त्रज्ञ शोध लावतात,पोलिस गुन्ह्याचा तपास करतात. मनोरजंन क्षेत्रात छोटेसे काम केल्यास तो सेलिब्रिटी होतो.प्रत्येकाच्या कर्वृत्वाचे यथायोग्य मुल्यमापन करून,त्या व्यक्तीला समाजात योग्य स्थान देण्याची दृष्टी आणि विवेकबुध्दी आपल्याला कोण दाखवणार?

             टीव्ही ह्या माध्यमानेच कलाकाराना सेलिब्रिटीचा मान मिळतो असे सिध्द होत आहे.प्रसिध्दी मिळाली कि तो सेलिब्रिटी होतो.लोक ज्याला ओळखत नाहीत तो सेलिब्रिटी होत नाही.आपल्या कार्यक्रमाना प्रसिध्दी मिळण्यासाठी  सेलिब्रिटीना बोलवून त्यांच्या नांवाचा वापर केला जातो..सेलिब्रिटी आले की त्या जागेच महत्व वाढते.वस्तूही विकल्या जातात.


       सिद्धीविनायक आणि लालबागचा राजा ही आपण मुंबईकरांसह सेलिब्रिटीची दोन हक्काची श्रद्धास्थानं.अगदी खूप आधीपासून अनेक कलाकार शूटिंगमधून मुद्दाम वेळ काढून सिद्धीविनायकाच्या दर्शनाला यायचे. कालांतराने, त्यांच्या कामानं,नशीबाने आणि सिद्धीविनायकाच्या श्रद्धेने म्हणा हवं तर पण हे कलाकार सेलिब्रिटी झाले.  

              सेलिब्रेटीना खुपच मान दिला जातो. मोठे सेलिब्रिटी आपल्या कामाने मोठे झाले आहेत.क्रिकेटपटूसह इतर खेळातील काही खेळांडु,हिंदी व मराठी सिनेकलाकार,गायक व माँडेल सेलिब्रिटीआहेत.राजकारण्यांना सेलिब्रिटीचा मान मिळत नाही.

   
           मुंबईतील १२ मार्च १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सेलिब्रिटी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानं बाँलीवूड  हळहळले.तसेच काळवीट प्रकरणात बरेच सिनेकलाकार अडकले असल्याने सेलिब्रिटी यांच्या मागे व अभिनेता संजय दत्तच्या मागे बाँलीवूड उभे राहीले आहे.ही मडंळी सेलिब्रिटी असल्याने त्यानी शिक्षा भोगायची नाही असे त्यानी ठरवले आहे वाटते. सेलिब्रिटीना मान मिळेल पण त्यानी गुन्हा केल्यास त्याची शिक्षा भोगायचीच आहे. सेलिब्रिटीना केव्हाच शिक्षामाफी नको.

               सेलिब्रिटीनी जनतेनी दिलेला मान राखावा. सर्वजण आपापली कामे करतात.पण हीच मडंळी सेलिब्रिटी का होतात? जरा कोणी मनोरंजनाचे काम केले की तो झाला.सेलिब्रिटीयाना मान दिल्याने ही मडंळे स्वत:ला मोठे समजु लागले आहेत.


              सेलिब्रिटी होण्याआधीचा मी आणि आत्ताचा मी यात खूप फरक आहे. खूप आत्मविश्वास मला या क्षेत्राने दिलाय. पण सेलिब्रिटी झाल्यासारखं केव्हा वाटलं त्याचा एक किस्सा सांगतो. एके दिवशी मला एका सायकॉलॉजिस्टचा फोन आला. त्यांनी मला एका मुलीबद्दल सांगितलं. त्या मुलीला कॅन्सर झाला होता. तिची जगण्याची इच्छाच मेली होती. मी तिच्याशी फोनवर बराच वेळ बोललो. त्यानंतर काही दिवसांनी मला पुन्हा त्या सायकॉलॉजिस्टचा फोन आला. ती मुलगी बरी झाल्याचा फोन होता तो. माझ्यामुळे कोणीतरी बरं झाल्याचं फिलिंग खूप चांगलं होतं. त्या क्षणी मला मी सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटलं--- अभिजित खांडकेकर , अभिनेता


          'सारेगमप'ने प्रसिद्धी खूप दिली. पण त्यामुळे सेलिब्रिटी झाल्याचा त्रास होत नाही का? यावर मी 'सेलिब्रिटी' आहे हे इतरांना वाटते. मी पूर्वीसारखाच आहे, हेही तो आवर्जून सांगतो. दोस्तांबरोबर तो आजही क्रिकेट खेळायला जातो. त्यावेळी त्याला त्याचे दोस्तही तो 'सेलिब्रिटी' आहे हे जाणवून देत नाही. मात्र, लोक ऑटोग्राफ मागायला येतात, त्यावेळी छान वाटतं, हे सांगायलाही विसरत नाही--रोहीत राऊत (लिटिल चॅम्प्स)


            समाजात अभिनेते आणि अभिनेत्री जणू ओवाळून टाकावेत इतके सर्वगुण संपन्न आहेत,असे मानून त्यांना आदर्श मानण्याची जी घतक प्रवृत्ती सर्व सामान्यांमघ्ये तसेच इतर वर्गामघ्येही भिबली आहे.ती अत्यंत चिंताजनक आहे.एकेकाळी देशभक्त,समाजसुधारक यांचा त्याग,त्यांची देशाचे,समाजाचे भले होण्यासाठीची घरपड करण्याची वृती ही आदर्श मानली जात होती.सेलिब्रिटी वर्गाचे कौतुक करणे हे माध्यमांच्या दुरपोयगामुळे प्रमाणाबाहेर वाढत आहे.


          जी सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकली आहेत , त्यांच्यावरील आरोपांचा डाग दूर होत नाही तोपर्यंत त्यांना आपल्या नवीन चित्रपटांमध्ये घेणार नाही , अशी भूमिका कुठल्याही निर्मात्यानं घेतली नाही.तसेच गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या सेलिब्रिटींवर टीका होणं साहजिक आहे. मात्र अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांचे चित्रपट आपण पाहणार नाही ,अशी भूमिका किती प्रेक्षकांनी घेतली आहे ?


          सिनेसृष्टीतील नट नट्यांबद्दल सामान्यजनांमध्ये नेहमीच आकर्षक राहिले आहे. त्यांच्या बोलण्याच्या लकबी , ड्रेस , शूज , केसांची ठेवण यासह बऱ्याच बाबींची नक्कल केली जात असते. मात्र मिडियातील मंडळीसुद्धा सेलिब्रेटींच्या मागे लागून त्यांच्याविषयी चटकदार बातम्या मिळविण्यात मागे नसतात.



        हॉलिवूडमधील जगप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिची जगातील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटी म्हणून निवड झाली आहे.


           सेलिब्रिटीना किती मान द्यायचा हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे?.
 

1 comment:

Anonymous said...

संजय दत्त याला शिक्षा अनाठायी दाखविलेल्या शौर्यामुळे मिळाली आहे. अनाठायी शौर्य दाखविल्याबद्दल दिलेल्या या शिक्षेला माफी दिल्यास नुकीना पायंडा रडेल.