Tuesday, June 9, 2020

अनलॉक सुरु




                                                           अनलॉक सुरु



मुंबईमध्ये अनलॉक सुरु करण्यात आला आहे.थांबलेली मुंबई पुन्हा नव्याने सुरु झालेली दिसली.एका विषाणूने मुंबईला रोखले होते..मुंबईचा श्वास रोखला होता.मुंबईने आज ब-या दिवसांनी दिर्घ श्वास घेतला असणार.खर तर जेव्हा रेल्वेसेवा सुरु होईल तेव्हाच मुंबईचा वेग वाढेल. भूतकाळात रमणारी, वर्तमानाशी एकरूप होणारी आणि भविष्यकाळाला भिडणारी ! बदल हा या शहराचा स्थायीभाव आहे.  

लॉकडाऊन संपवून अनलॉक सुरु झाल्याने घरात अडकून पडलेली मंडळी एकदम मोठ्या संख्येने घराबाहेर पडली आहेत.रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे.कार्यालयात वेळेत पोहचण्याची सर्वांचा प्रयत्न होता.रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने इतर वाहतुक सेवांवर ताण पडत आहे.उपनगरातून बरीच मंडळी आपल्या गाड्या व सोबत मित्रांना घेऊन निघाले आहेत.

सार्वजनिक वाहतुक सेवा नसताना देखील कार्यालयातून उपस्थिीत सक्तीची करण्यात येत आहे.दुकाने,हॉटेल,मंदीर व बेस्ट सेवा सुरु होत आहे.रेल्वे सेवा सुरु करण्याच्या विचार आहे.सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलिस बाधित असल्याने पोलिसबळ कमी पडत आहे. प्रवाशांच्या सहनशीलतेचा इतका कडेलोट झाला की सामाजिक अंतराचे नियमही धाब्यावर बसविले गेले. परिणामी उभ्याने पाच प्रवाशांची मर्यादा असूनही आठ ते दहा प्रवासी उभे राहून प्रवास करीत होते. तर एका आसनावर दोन-दोन प्रवासीही बसत आहेत.बस शिरताना शिस्त पाळली जात नव्हती.अगोदरच मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना प्रवाशांचे हाल झाल्याने नियमांचे उल्लंघन होत राहिल्यास करोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढू शकतो. लॉकडाउन संपला म्हणजे करोनाचा धोका टळला असे नाही. लॉकडाउनच्या अटी शिथिल होऊ लागल्या असल्या तरीही करोना व्हायरस आहेच. त्यामुळे शहरातील प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे.अशा परिस्थितीत काही दिवसात पावसाळा सुरु होत असल्याने नागरिकांना जबाबदारी घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल.  

नवीन बाधित आढळू नये, यासाठी सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर, विनाकारण घराबाहेर न पडणे, गर्दीची ठिकाणी टाळणे आवश्यक आहे. याबाबत शासन-प्रशासन सातत्याने जनजागृती केली आहे.पण नियमांचे पालन होत नाही.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेत आहे.मात्र जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना नागरीक गर्दी करताना दिसून आले.अशा गर्दीमुळे भविष्यात मोठे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसागणिक वाढतोच आहे.मात्र,तरीही देश अनलॉक करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली  आहेत.महाराष्ट्र सरकारनेही 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेतच.त्या नियमानुसार कार्यप्रणाली होत आहेत का? ते पाहायला कोणीच नाही? त्यामळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी घ्यायची आहे.सार्वजनिक क्षेत्रात वावरताना एक शिस्त आपल्याला असायला हवी.प्रत्येकाने नियमाचे पालन करीत आपली सुरक्षा जपत वावरले पाहिजे.

शासन-प्रशासन सातत्याने जनजागृती आपल्याला जागृत केले आहे.यापुढे करोना जात नाही तोपर्यत आपली स्वत:ची सुरक्षा आपण जपत जगायचे आहे.आपली सुरक्षा आपल्याच हाती ...




No comments: