Sunday, June 14, 2020

व्यसनमुक्ती व व्यसनाधीन

                                                     व्यसनमुक्ती व व्यसनाधीन

मी काय व्यसनाधीन नव्हतो.पण व्यसन कधीतरी करीत होतो.लॉकडाऊनच्या काळात घरात बंदिस्त असल्याने व्यसन वाढले होते. सगळे साहित्य घरातच उपलब्ध असल्याने माझे व्यसन सुरु होते.पण साठा संपल्यानंतर व्यसनाची ओढ जास्त वाढली.मला व घरच्यांना त्रास होऊ लागला.काय करावे ते कळत नव्हते.रात्री झोप लागत नव्हती.लॉकडाऊन कधी संपले याची कल्पना नसल्याने आपले कसे होणार? याच विंवचनेत पडलेलो असायचो.काही दिवस धीर धरला.एक दिवस निश्चय केला यापुढे व्यसन करायचे नाही.बहुतेक हा लॉकडाऊन आपले व्यसन सोडवण्यासाठीच असल्याचे वाटले.दुकाने सुरु झाली तरीही मी तिकडे फिरकलोच नाही.आता लॉकडाऊन संपले तरीही मला आता व्यसन करावेस वाटत नाही.यापूर्वी मी व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी मात्र मी यशस्वी झालो.मला व माझ्या कुटुंबाला या लॉकडाऊनने हे मोठे बक्षीस दिले आहे.माझ्या व्यसनमुक्तीने माझी बरीच आजारपण दूर झाली.घरातले वातावरण शांत व प्रसन्न झाले.माझ्या कुंटुबातली मंडळी आंनदी झाली.माझ्या व्यसन करणा-या मित्रांना मी व्यसनमुक्तीचा सल्ला देत आहे.माझ्या आयुष्यातला हा मोठा बदल लॉकडाऊने दिल्याने लॉकडाऊन कायमचा लक्षात राहील.    

माझे व्यसन पहिल्यापासून सुरु होते.मित्रांसह पार्ट्या होत असत.व्यसन करायला मित्र असले की वेगळी मजा असते.अचानक लॉकडाऊन सुरु झाले.लॉकडाऊनमध्ये मित्र बरोबर नसल्याने एकट्यावर बसण्याची वेळ आली.त्यानंतर साठा संपल्याने पंचाईत आली.मित्रांकडे चौकशी केली.पण काहीच सोय न झाल्याने माझी बैचनी वाढली.कुटुंबात भांडणं झाली.मुलं धास्तावली व दुरावली.झोप येत नसल्याने आजारपण बळावले.अगदी शेवटी दुकाने सुरु झाल्याचे कळल्यावर मी माझा साठा भरुन टाकला.मग काय माझा माझ्यावर नियंत्रण राहीले नाही.या लॉकडाऊनमध्ये माझ्या सारखे बरेच जण व्यसन वाढल्याने व्यसनाधीन झाले.कार्यालयात कामावर हजर राहण्याची नोटीस आली.तब्तेत ढासळल्याने मला कामावर रुजु होता आले नाही.औषधोपचार सुरु झाले.या लॉकडाऊनने माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली.या लॉकडाऊनमध्ये कितीतरी कुटुंब उध्वस्त झाली आहेत.लॉकडाऊनचा समाजावर मोठा परिणाम झाला.   

सध्याच्या या परिस्थितीने दोघांच्या आयुष्यात मोठे बदल केले. एक सुधारला तर एक बिधडला. व्यसनाच्या दुष्परिणामाकडे ज्याने दुलर्क्ष केले तो व्यसनाधीन झाला व ज्याने व्यसनाच्या दुष्परिणामाकडे लक्ष दिले तो व्यसनातून मुक्त झाला.अनेकजण बऱ्याच वर्षांच्या सवयीमुळे मद्यपानाच्या आहारी गेलेले असतात तर कित्येकजणांना फक्त एकच घोट प्यायल्यानंतर मद्यपानाची ओढ लागलेली असते. बदलत्या जीवनशैलीत मद्यपान करणे, ही जवळपास एक फॅशनच झाली आहे. एक अनुभव घेण्यासाठी मद्य पिणारी व्यक्ति नंतर कशाप्रकारे मद्याच्या आहारी जाते, हे तिलाच समजत नाही आणि त्यानंतर तिला मद्यपानाची एवढी सवय होऊन जाते की, मद्यपान टाळणे तिला शक्य होत नाही. अतिमद्यपान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिचा समाजाला व कुंटुबाला कायम त्रासच होत असतो.कोणतेही व्यसन शरीराला घातकच असते. त्यापासून अनेक आजार उद्भवतात. तरीही लोक व्यसन करतात. धूम्रपानाप्रमाणे मद्यपानही शरीराला घातकच आहे. त्यापासून दोनशेहून अधिक आजार बळावतात.तरीही लोक मद्यपान का करतात? 

मद्यपान करणाऱ्या बहुतेक लोकांना त्याचा नकारात्मक परिणाम माहित असूनसुद्धा स्वत:ला दारू पिण्यापासून थांबवू शकत नाहीत.मद्यपानामुळे काम आणि करिअर,आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधावर परिणाम होतो.समाजाचा मद्यपान करणाऱ्यांकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलतो.    

व्यसन हे व्यसनच, मग ते कुठलेही असो, घातकच असते. रोग झाल्यावर इलाज करण्यापेक्षा रोगच होणार नाही, याबाबत दक्षता घेणे केव्हाही चांगले नाही का?



No comments: