Tuesday, June 16, 2020

सायबर गुन्हे




                                                             सायबर गुन्हे 



लॉकडाऊनच्या काळात इतर गुन्हे कमी झाले पण सायबर गुन्हे खूपच वाढले व वाढत आहेत.हेच भयानक आहे.स्मार्टफोन हातात आल्यामुळे प्रत्येकजण ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देऊ लागला आहे. पण, सायबर चोरटे वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांना फसवू लागले आहेत.काही गुन्हेगार आणि समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकाराने फसवत असल्याने त्यांना पकडणे कठिण जात आहे.यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये.सध्याच्या काळत इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर भामटे वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करुन ज्येष्ठ नागरिकांना फसवित आहेत. कधी ते नागरिकांना खोट्या ऑफर्सच्या मोहात पडून एखादे अ‍ॅप डाऊनलोड करायला लावतात व नागरिकांच्या फोनचा ताबा मिळवतात.तसेच एखाद्या लिंकवर क्लिक करायला लावून बॅक खात्यातील पैसे लुटत आहेत.

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसअॅप मेसेजेस फिरत आहेत. या मेसेजेसमध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी किंवा कोणत्याही वेबसेरीजचे सब्सक्रिप्शन स्वस्तात आहे खालील लिंकवर क्लिक करा, असा मजकूर असतो आणि एक लिंक दिली असते. आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये. कारण सदर लिंक्स आणि मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे.

आज सायबर गुन्हे वेगाने वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. सायबर गुन्ह्यांमुळे अनेकांचा पैसा डोळ्यांदेखत गायब झाला आहे. काहीवेळा आपणही या घटनेला जबाबदार असतो. कोणत्याही खोट्या कॉलला दिलेला प्रतिसाद हा आपल्याला आर्थिक अडचणीत आणू शकतो. यासंदर्भात सरकार आणि बँकांकडून वारंवार सूचना देऊनही लालसेपोटी, अमिषापोटी काही खातेदार बनावट मेलला बळी पडतात आणि नकळतपणे आर्थिक चक्रव्यूहात अडकत जातात. 

सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल कॉलद्वारे अधिकाधिक लक्ष्य केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल वापरण्याची माहीती कमी असल्याने ही मंडळी फसली जात आहे. आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन वापरता येणे अत्यावश्यक झालेले असल्याने ज्येष्ठ नागरिकांना हा स्मार्टफोन वापरण्याचा आत्मविश्वास मिळविला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी बॅकेचे व्यवहार ऑनलाईन करताना सावधानता बाळगली पाहिजे.आपल्या खात्याची कोणतीच माहीती कोणालाही देऊ नये.दुरध्वनी आल्यास  ज्येष्ठ नागरिकांनी बॅक खात्याची अथवा एटिएमची माहीती मोबाईलवर कोणालाच देऊ नये.

तुमचा ईएमआय स्थगित करण्यासाठी बॅकेकडून एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल.तो ओटीपी आमच्याशी शेअर केला तरच तुमचा स्थगित होईल.अन्यथा तुम्हाला ईएमआय भरावा लागेल.नागरिकांनी ओटीपी शेअर केल्यास त्यांच्या बॅक खात्यातून तात्काळ मोठी रक्कम काढून घेतली जाते.तेव्हा बॅककडून कधीच ओटीपी विचारला जात नाही.बॅकेबाबतची गोपनीय माहीती कुणाशीही शेअर केली नाहीत तरच तुमच्या खात्यातील रक्कम सुरक्षित राहील.

मी बँकेतून बोलतोय. तुमच्या एटीएम कोडचे नूतनीकरण करायचे आहे. जुना कोड सांगा, असे सांगून फोनवर गोड गोड बोलणारी तरूणी तुम्हाला बोलण्यात गुंतवून ठेवतेआणि इतर माहिती विचारून घेते. यानंतर पाच मिनिटांतच तुमच्या बॅंक खात्यातून पैसे काढल्याचे मोबाईलवर मेसेज येतो आणि तुम्हाला धक्का बसतो.तुम्ही गोंधळून जाता.त्यामुळे तुम्ही तातडीने बॅंकेच्या शाखेत जाता. मात्र, बॅकेचे अधिकारी तुम्हाला फसवणूक झाल्याचे लक्षात आणून देतात. मग तुम्ही पोलिस ठाणे गाठता. तिथे पोलिस दखल घेतीलच असे नाही. कारण सायबर क्राईम करणारे खूपच निष्णात असतात आणि अनेकदा त्यांचा भल्या भल्यांना शोध लावता येत नाही. आजपर्यंत देशात लाखो लोकांची ऑनलाईनद्वारे बॅंकेत पैसे काढून फसवणूक झाली आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान, यात तुमचाही नंबर लागू शकतो. काळजी घ्या.



हॅलो, मी बँकेतून बोलतोय.......लगेच सावधान व्हा.    
 

No comments: