Wednesday, June 24, 2020

मन अधीर झाले.

                                                    मन अधीर झाले.
 
गेल्या दोन ते अडीच महिन्यात प्रेमिकांना एकमेकांना भेटता न आल्याने विरह वाढत गेला आहे.प्रेमीयुगुलांचा मुक्तसंचार थांबला होता.रोज भेटणारी ती व भेटणारा तो न भेटल्याने प्रेमी त्रासलेले आहेत. बसस्टॉप, बसमध्ये, कॉलेज, ऑफिसमध्ये तर कॅंन्टिनमध्ये भेट व्हायचीच.आता कधी एकदा भेटायला मिळेल याची दोघेही चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.मनाची घालमेल वाढली आहे.किती दिवस मेसेज व व्हिडियो कॉलवर समाधान मानायचे? प्रेम ऐन बहारात असताना हे संकट आले आणि यांचे प्रेम दुरावले. त्याला आणि तिला भेटण्यासाठी मन अधीर झाल्याची मनस्थिती या प्रेमिकांची झाली आहे.जिवलगाच्या ओढीने जीव व्याकुळ झाला होता.

विरहामुळे जीवनात एक हरवलेपण येते, स्वत:चे भानच राहत नाही. तुला लगेच येऊन भेटावसं वाटत होतं पण ते शक्य नव्हतं,  असे तीला वाटत होतं. इतके दिवस विरहात घालविल्यामुळे भेटीची अपूर्वाई इतकी वाढली होती की, बाकी सगळे दुय्यम झाले आहे. इथून पुढे कुठे व कसे भेटायचे, नियती साथ देईल की नाही? अशी बेधुंद व  मनस्वी मनस्थिती निर्माण झाल्यासारखं, त्याला वाटत होतं.

खरे तर विरहात दोघेही एकमेकांना दोष देत नव्हती.वेळ तशी आली होती.पण भेट झाल्यावर मात्र मूळचा प्रेमाचा झरा खळखळ वाहू द्यायच असे दोघांनी ठरवलं. जे प्रेम  हरवले होते आणि ब-याच दिवसांनी पुन्हा गवसेल. प्रेमात विरह आल्यानंतर अनेकदा प्रेम संपत असे नाही तर प्रेम आणखी वाढतं. विरहानंतरची त्या भेटीत शब्दाविण तनामनाचा संवाद होत राहील.कित्येक दिवसांची तुझ्या भेटीची मनात असलेली आस लागून राहीली आहे.स्वप्नात का होईना रोज दोघे भेटत होती.पण जाग आल्यावर नाराज व्हायची.जाग येऊच नये असे वाटायचं.स्वप्न कधी खरी होणार याची वाटत होती.    

प्रेयुगलांची मात्र पंचाईत झाली. लॉकडाऊनमुळे इतर जनजीवन ठप्प झाले होतेच,  त्याच बरोबर प्रेमीयुगलांच्या चोरीछुपे भेटीही बंद झाल्या. लॉकडाऊनमुळे या वर्गाकडे कोणाचे लक्ष राहिले नाही. बागबगीचे व समुद्र किनारे बंद झाले.घराबाहेर पडण्याचे बहाणे देता येत नव्हते.दोन ते अडीच महिन्यांच्या दिर्घ विरहानंतर प्रेमीजन एकमेकांना भेटण्याची संधी मिळणार आहे.इतक्या दिवसांच्या विरहानंतर भेट झाल्यानंतर दोघांच्या भावनांचा बांध सुटेल.त्यावेळी आंनदाचे अश्रू अनावर होतील. 


विरहानंतर तिला त्याची व त्याला तिची भेट झाल्यावर एकमेकांशिवाय गेलेल्या काळाविषयी काय काय व किती सांगू असं काहीसं दोघांचं झालं होतं. इतक्या दिवसांच्या विरहानंतर आपलं माणूस आपल्या समोर असताना दोघांना काहीच सुचत नव्हतं.नुसते एकमेकांना पाहत बसले होते.

तुला न भेटता जाणारे ते दिवस मला कधीच आवडत नव्हतं
तुझे हसणं न दिसल्यानं माझे आयुष्य पुढे सरकत नव्हतं


प्रेम म्हणजे प्रेम असतं,तुमचं आमचं सेम असतं ...


No comments: