Thursday, July 16, 2020

खिडकीत रमलेली मुलं

खिडकीत रमलेली मुलं 

हल्ली मुलं कोठेच दिसत नाहीत. मुलं गेली कोठे? ह्या जगात मुलं नव्हती असे वाटायला लागलं आहे.गेल्या तीन महिन्यात लहान  मुलं दिसलीच नाहीत.घरात बंदीस्त झालेली आहेत. बगीचे ओस पडले आहेत.बिचारी खिडकीत बसून बाहेरच जग पाहत असतात. हे द्द्श्य पाहायला खूप वाईट वाटते.देवा ह्या मुलांना अशी शिक्षा का दिलीस? मुलांची शाळा संपली, परीक्षा झाली नाही, सुट्टीही संपली आणि नव्याने शाळा सुरु झाली तरीही मुलं घरातच आहेत.हे सगळे मुलांनी घरातच राहून अनुभवले. 


मुलं म्हणजे फुलपाखरं ,त्यांना हवं तसं उडू द्यावं, त्यांच्या पंखांत लपलेलं आभाळ, त्याचं त्यांना शोधू द्यावं. मुलं म्हणजे निखळ हास्य, चैतन्य व उत्साहाचे झरे. प्रत्येक लहान मूल अत्यंत निरागस आणि निष्पाप असते. लहानपण हे खरंच सुंदर आणि निरागस असते. लहान मुलांचे विश्वच खूप वेगळे असते. 

आईबाबा बाहेर सोडत नाहीत.संवगडी भेटत नाहीत व दिसतही नाहीत.बागडणारी मुलं कोडली गेली आहेत.शाळा नाही,मॉल नाही,हॉटेल नाही,चित्रपट नाही,पिकनिक नाही,काहीच नाही.फक्त घर ऐके घर. काय हे मुलांच विश्व? त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करता येत नाही,हे मोठे दु:ख आहे.खायला देखील रोज विशेष नसतं.केव्हातरी शेजारच्या मित्राबरोबर खिडकीतून किंवा गॅलरीतून गप्पा होतात..मुलांच्या आईबाबांनी या मुलांना समजावून थोपून धरले आहे. किती गेम खेळणार? किती चित्रपट पाहणार? किती छंद जोपासणार? घरात एकच मुलं असेल तर त्याची कुचंबणा जास्त होते. मुलांना त्यांच्या बरोबरच्या मुलांबरोबर खेळायला व मस्ती करायला मिळत नसल्याने आंनदी नाहीत.आईबाबा तरी किती वेळ खेळणार? थोड्या वेळाने ते त्यांच्या मोबाईलमध्ये आम्हाला विसरून जातात. मग लहान मुलं आजीआजोबांची सोबत शोधतात. काही पालकांनी मुलांशी संयमाने वागत चांगल्या पद्धतीने नात विकसित केले आहे. मुलाचे लहानपण सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आजचे पालक अगदी मनापासून जीवतोड प्रयत्न करतात. मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांचा वेळ, लक्ष, संवाद आणि प्रेम या अत्यंत महत्त्वाच्या चार गोष्टींची गरज आहे.    


घराची खिडकी हे मुलांच्या आवडीचे ठिकाण झाले आहे.तेथेच बसून असतात.बाहेरची हालचाल न्याहळत असतात.त्यांचा एकटेपणात घालवण्यासाठी खिडकी जणूकाय त्यांची मैत्रिणी झाली आहे. खिडकीतच जेवतात. पक्षांचा खायला घालतात. पक्षांशी बोलतात. वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेळतात.खिडकी बसून जग पाहत असतात.मुलांच ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्याने त्यांचा थोडा वेळ त्यांचा ऑनलाईन अभ्यास जातो.पण वर्गातील मजा घरात येत नाही. मुलं घरात बंदीस्त असल्याने चिडचिडी झाली आहेत.  


खेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं. ही खेळणी म्हणजे या लहान मुलांची निरागसता होती. ती खेळणी  खेळताना मुल दिसत नाहीत. अलिकडे मात्र या खेळण्यांची जागा डिजीटल खेळण्यांनी घेतल्याने मुलं घरात पडलेली असतात. मुलं मोबाईल किंवा संगणकावरच्या खेळात गुंतली की पालकांना कमी त्रास होतो. मुलांनी मोबाईल, व्हिडिओ गेम्स सारख्या खेळांकडे न वळता निरागसता जपणारे खेळ खेळावेत.


खरंतर उन्हाळ्यातील सुट्टी म्हणजे बच्चे कंपनी साठी मौज मस्ती करण्याचे दिवस पोहणे, मामाच्या गावाला जाणे,खेळणे,खूप गप्पा मारणे, मित्राशी भांडणे आदी चा आनंद घेण्यासाठी मुलं या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतात पण हे सर्व मृगजळच ! या सर्वांवर कोरोना या महमारीने पाणी फिरवले आणि सर्व काही लॉक डाऊन झाले.

डॉक्टर व परीचारीका,पोलिस यांना आपल्याला मुलांना भेटता देखील येत नाही.हे तर खूपच दुःखदायक  आहे. 

लहान निरागस मुलांना या महामारीचे काय गांभीर्य!
पण यावर्षी त्यांचा सर्व आनंदावर पाणी फिरल्याने दु:ख झाले आहे.

No comments: