Thursday, February 16, 2012

प्रबळगड

  संवगडी निधाले प्रबळगडावर मी ही निधालो.एक दिवसाचा ट्रेक मजेत झाला.हलकीशी थंडी होती. हायवेवरच्या शेडुंग फाट्यावरुन डावीकडे वळून ठाकुरवाडीच्या वाटेला लागलो. 
















हा गड इंग्रजानी माथेरान सारखे थंड ठीकाण करण्याचे ठरविले होते.पण त्याना पाण्याची अडचण असल्याने कळल्यावर त्यानी 'माथेरान' कडे मोर्चा वळवला.

















प्रबळमाची या गावात चहापाणी करुन गडावर जाता येते.गडावरुन ‘कलावंतीण’ हा उभा दुर्ग  पाहण्यासारखा आहे. या दुर्गावर चढण्यासाठी उभ्या पाय-या गडावरुन बधताना भिती वाटते.




















उत्तर कोकणातील हा किल्ला पनवेल, कल्याण या प्राचीन बदरांवर नजर ठेवण्यास बाधंला असावा.



















माथेरानचा सनसेट पॉइंट, धुरकट दिसणारा हरिश्चंद्रगड, प्रबळमाची गाव, असं सारंच दृश्य दमछाक विसरायला लावते.




















पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड,इर्शाळ गड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे. 


















मुंबई-पुणे हमरस्त्यावर जाताना दिसनारा हा प्रबळगड बलवान असनारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधुन घेतो. प्रबळगड आणि कलावंती दुर्गाचा 'V' Shape नेहमीच लक्ष वेधून घेतो.
























कलावंतीण दुर्ग आणि प्रबळ गडला जायचा मार्ग.साधारणपणे पनवेल पासून १४ किलोमीटर वर ठाकूरवाडी या गावात शिरल्यावर 'ठाकूरवाडी'त समोर 'प्रबळगड' आणि 'कलावंतीण दुर्ग' लक्ष वेधून घेतात.
























माथेरानच्या पश्चिमेला असणारा प्रबळगड हा नावाप्रमाणेच प्रबळ आहे



















महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाची सोय होते.






















या गडावरुन मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, इरशाळगड हा परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. उन्हाळा सुरु होण्याअगोदर हा शेवटचा ट्रेक होता.

3 comments:

UEH said...

सुंदर संग्रह आहे...
माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या मराठी ब्लॉग ला विझिट द्यायला विसरू नकोस ;-)
http://themarathi-blog.blogspot.in/

BinaryBandya™ said...

sundar photo..

PRABALAGD HOTEL ROOM GUIDE SERVICE -8056186321 said...
This comment has been removed by the author.