Thursday, May 10, 2012

मरावे परी देहरुपी उरावे...!


   दान देणं ही समाजाची एक बांधिलकी आहे.माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या अवयवांच्या रुपाने आपली आवडती व्यक्ती जिवंत राहू शकते.रक्तदानाप्रमाणेच मरणोत्तर देहदान,  त्वचादान,   अवयवदान,   नेत्रदान   याचाही समाजात प्रसार सुरु झाला आहे.रक्तदानाप्रमाणे सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला रक्तातील प्लेटलेटस चेही दान करता येते. सध्याच्या काळात नेत्रदान,त्वचादान आणि देह्दान याला अनन्यसाधारण महत्व आहे.डोळ्यांबरोबरच हृदय , फुफ्फुसं , मूत्रपिंड , यकृत , स्वादूपिंड , आतडी , अशा अवयवांचंही दान आणि प्रत्यारोपण करता येते.आपल्या मृत्युनतंर आपले शरीर आणि अवयव दुस-या व्यक्तीसाठी उपयोगी पडले तर त्यासारखे अन्य पुण्य असूच शकणार नाही. अंधाला डोळे मिळाल्यामुळे तो हे जग पाहु शकत तर संपूर्ण देह वैद्यकिय शाखेच्या विद्यार्थ्याना अभ्यासाकरीता उपयोगी येतो.दान केलेली त्वचा ही भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर शस्त्रक्रियेद्वारे लावला येऊ शकतो. गरजवतांना  हे अवयव मिळाल्यास त्याना  नवीन जीवन मिळते.आपण देहदान किंवा अवयव दान केल्यास या गरजवतांना त्याचा फायदा होतो.

वैद्यकशास्त्राला देहदान,नेत्रदान,अवयवदान, त्वचादान यांसारख्या दानाची नितांत गरज आहे.मृत्यूनंतर आपला देह शास्त्रीय संशोधनासाठी उपयोगी पडावा,या उदात्त हेतूने देहदान करणा-यांची संख्या वाढत आहे.देहदानाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत.ह्या गैरसमजांना सुधारायची खुप गरज आहे. विभक्त कुटुंबं , धामिर्क श्रद्धा आदी कारणांमुळे अवयवदान करण्याला फारसे प्राधान्य मिळत नाही.ब-याचदा देहदानाची इच्छा व्यक्त होते पण मृत्यूनंतर नातेवाईकांकडूनच त्याला विरोध होतो.

अवयवांचे प्रत्यारोपणासाठी आवश्यक ते अवयवदाता न मिळणे हा आता अत्यंत ज्वलंत विषय झाला आहे. याविषयी लोकजागृतीची नितांत गरज आहे. देशभरात अनेक  रुग्नांच्या अवयवांचे प्रत्यारोपणाच्या कमतरतेमुळे प्रचंड वेदना सहन करत आहेत. त्यांना वेळीच अवयवांचे प्रत्यारोपणाचे  साहाय्य मिळाले  असते तरच त्यांचे जीव वाचू शकतील. पण त्या प्रमाणात अवयवदाते मिळत नसल्याने अनेक रुग्ण  वेदनामय जीवन जगत आहेत.

गावातल्या मजुरी करणा-या कुटुंबाने अपघातात मरण पावलेल्या मुलांचे देहदान केल्यामुळे तीन जणांना जीवदान मिळाले आहे.असे अशिक्षित मडंळी देहदान करतात पण शिक्षित मडंळी मागे का?

युरोपीय देशांमध्ये प्रत्येक दहा लाखांमागे 35 टक्के लोक अवयवदान करतात, तर भारतात केवळ 0.05 टक्के अवयवदान करतात.अवयवदानात आपल्या देश खुपच मागे आहे.मोठी लोकसंख्या  असलेल्या देशात देहदान व अवयवदान करणा-यांची सस्ख्या जास्त असायला पाहिजे होती.या दानाची महती ची जाहीरात करायला पाहिजे.देशात दररोज किमान 15 लोक अवयवांच्या कमतरतेमुळे मरण पावतात. एका माणसाच्या अवयवदानामुळे नऊ लोकांचे आयुष्य वाचू शकतात.म्हनुनच अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागृती करणे आवश्‍यक आहे.अवयवांची निकड आणि त्यांची उपलब्धता यांचं प्रमाण व्यस्त आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकांत जागृती आवश्यक आहे.

जनजागृतीचा अभाव, गरजू पेशंटना मार्गदर्शनाची कमतरता, सरकारचे उदासीन धोरण तसेच कायद्यातील त्रूटी यामुळे भारतात अजूनही अवयव प्रत्यारोपण आणि अवयवदान उपचार पद्धतीचा प्रसार झालेला नाही.

आजारांनी गलितगात्र होऊन जगण्यातला रस गेलेल्यांसाठी इच्छामरणाची वाट खुली करावी , अशी मागणी जोर धरत असताना ' अमरत्वा ' कडे नेणारी अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाची वाट मात्र दुर्लक्षितच राहिल्याची खंत आहे.

' ब्रेनडेड ' झालेल्यांची जीवरक्षक यंत्रणा काढून घेतल्यानंतर , विशिष्ट कालावधीत त्याच्या शरीरातील अवयवांचं कोणा गरजूच्या शरीरात प्रत्यारोपण केलं , तर त्याला नवं आयुष्य मिळू शकतं. अर्थात त्यासाठी अशा व्यक्तीने हयात असताना प्रत्यारोपणा-साठीच्या ' डोनर कार्ड ' वर स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. हे कार्ड म्हणजे अवयवदानासाठीचं इच्छापत्रच असतं


'देणा-याने देत जावे' ही विंदांच्या कवितेची ओळ त्यांनी केलेले देहदान या दोन गोष्टीतला  संबंध शोधता शोधता मन 'दान' या संकल्पनेभोवती पिंगा घालतो.

इच्छापूर्ती व्हायची असेल तर त्याला अवयवदान हा उपाय आहे..


जिवंतपणी रक्तदान , अवयवदान
 मृत्यूनंतर देहदान.  आपला देह सत्कारणी लावा.

1 comment:

Anonymous said...

छान लेख. पण तेच, नातेवाईक अडथळा आणतात, छोट्य़ा गावांमध्ये त्यासंदर्भात असणारी व्यवस्था उपलब्ध नसते, मोठ्या शहरात मृतदेह ठेवायलाही रुग्णालयात जागा नसते अशी बरीच कारणंही असावीत.