Tuesday, May 15, 2012

दहाव्याचा विधी


     काल मुंबईत दहाव्याच्या विधीला शिवाजी पार्कला गेलो होतो.शहरात सर्वात जास्त दहाव्याचे विधी या ठिकाणी होतात.एका शेडखाली एकाच वेळी ब-याच विधी शांतपणे पार पडत असतात.सगळीकडे होमाचा धूर असून हवेत वेगळाच दर्प येत असतो.वातावरण धीरगंभीर वाटते. ब्राम्हण व त्यांच्यासमोर  मयताची व्यक्ती बसून त्यांचा विधी सुरु असतो.बाजुला त्याचे  शोकाकुल नातेवाईक मंडळी शांतपणे हा विधी पाहत असतात.जवळच्या नातेवाईकाना प्रेतयात्रेला जायाला जमत नाही ती मडंळी या विधीला आवर्जुन येतात.

मयताला मुक्ती मिळावी यासाठी दहाव्याचा विधी जिवीताना करावा लागतो.हिंदू धर्मात हा विधी प्रत्येक सज्ञान व्यक्तीचा हा विधी केला जातो.गांवाला नदी किनारी पाण्य़ाच्या बाजुला असेल विधी केले जातात.

ही विधी या ठिकाणी शिस्तित होत असतात.केसकर्तनालयात केस काढले जातात.आंधोळ केली जाते व उघड्यानी सफेद पंचा लावून या विधीला बसावे लागते.तर ब्राह्मणमडंळी भाताच्या पिठाचे पिंड व इतर वस्तूंची तयारी करतात.विधीला जवळ जवळ एक तास लागतो.ह्या विधीचा प्रकार वेगळा असतो. या विधीसाठी ब्राह्मण खुप पैसे घेतात.या विधी करणारे ब्राह्मण प्रवित्र कामे करीत नाहीत.

  विधी झाल्यानतंर नातेवाईक व मित्रमडंळी नमस्कार केल्यावर भाताचा तयार केलेला पिंड कावळ्याने येउन टोच मारावी व तो खावा यासाठी बाजूस ठेवला होता.पिंडाला कावळा शिवल्याशिवाय दहाव्याचा विधी पूर्ण होऊ शकत नाही.कावळ्यांना किती महत्व आहे. ते मला तिथे जास्त जाणवले. पिंडाला कावळा शिवला नाही तर मयत माणसाच्या इच्छा पूर्ण झाल्या असे मानले जाते.

  मुबंईत काही जवळची मडंळी या विधिला उपस्थित असतात.ही विधी पूर्ण करुन झल्यावर  त्याना आपल्या धंदा व कामावर जाण्याची घाई असते.ती मडंळी तेथे जास्त थांबण्यास तयार नसतात.

आजही अधुनिक युगात माणूस मेल्यानंतर या विधी केल्या जात आहेत.देहदानाचे मृत्यूपत्र केलेल्या मयत माणसाच्याही ह्या सर्व विधी केल्या जातात.हा सर्वाच्या भावनेचा प्रश्न आहे.

1 comment:

sharayu said...

योग्यरितीने अंत्यसंस्कार झाल्याखेरीज मृताला सद्गती मिळत नाही ही हिंदूतील पितृपूजक संप्रदायाने रूढ केलेली समजूत यामागे आहे. मृतदेहाचा अवमान होऊ नये वा केला जाऊ नये म्हणून अंत्यसंस्काराची हीच पद्धत सर्वच हिंदू संप्रदायानी स्वीकारली आहे.