Friday, November 23, 2012

मुंबईकर शाबास



      शिवसेनाप्रमुख हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आजारानतंर निधन झाले आणि मुंबई शांत झाली.शिवसैनिकांनी  मातोश्रीवर धाव घेतली.मुबंईत आंदोलन होण्याची सर्वाना भीती असल्याने मुबंईकर भितीने सैरावैरा धावू लागले.पण  मुंबईत शातंता राखण्याचे आदेश आल्याने संगळीकडे शांतता राखण्य़ात आली.महाराष्ट्रातून असंख्य शिवसैनिकांनी मुंबईकडे  धाव घेतली.


           

        रविवारी सक़ाळापासूनच मातोश्रीवर कँमेरे लावले गेले.शिवसैनिकांनी सेनाभुवन व शिवाजीपार्क आपल्या ताब्यात घेतले.बाळासाहेबांचे शेवटचे दर्शनासाठी मुंबईकर शिवाजी पार्कात जमू लागले.महानेत्याच्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक लोटले होते. प्रत्यक्ष उपस्थित असलेले लाखो शिवसैनिक आणि राज्यभर आपापल्या घरात टीव्हीसमोर बसून असलेले करोडो चाहते बाळासाहेबांच्या शांत,समाधानी चेह-याकडे पाहात हुंदके आवरत होते.जनसमुदाय जमला होता. मुंबईच्या कडेकडेने  वाहणा-या सागराने असा जनसागर यापूर्वी कधी पाहिला नव्हता आणि भविष्यात तशी शक्यताही दिसत नाही.


        मोठ्या संख्येने मुंबईकर अंतयात्रेत सहभागी होण्याची शक्यता होती.पण अंतयात्रेत वीस लाख बाळासाहेबांचे चाहते सहभागी झाले.केवळ बाळासाहेबांवरील निस्सिम प्रेम . राजकीय नेत्यांना केवळ मतलबापोटी नेतेपद बहाल करणा-या पोटभरू राजकीय कार्यकर्त्यांची ही गर्दी नव्हती.मातोश्री ते शिवाजीपार्क या अवघ्या पाच किलोमीटर्सच्या प्रवासाचे बाळसाहेबांच्या चाहत्यांच्या गर्दीने सात तासांच्या महाप्रवासात रूपांतर  झाले.मंबईकरानी  दिवसभर उपाशी राहुन साहेबांना अखेरचा दंडवत घातला.त्यामघ्ये सर्व पक्षाचे व वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चाहत्यांचा मनापासून सहभाग होता.

             त्याच्या अंतयात्रेचे प्रेक्षपण मिडीयाने केल्याने पूर्ण दिवस घरातून बसुन बाळासाहेबांची अंतयात्रा पाहत मुबंईकरानी  त्याना श्रध्दांजली वाहीली.तमाम शिवसैनिकांनी,चाहत्यांनी त्या दोन दिवसांत आपल्या भावनांचे उद्रेक इतरांना त्रासदायक ठरणार नाहीत,याची खबरदारी घेतली होती.बाळासाहेबांच्या वियोगाच्या दुःखाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली.

          शिवतिर्थावर शिवसेना स्थापन झाल्यापासून हिंदुसम्राट बाळासाहेबांनी शिवसैनिकाना मार्गदर्शक केले. साहेबांचा या शेवटच्या प्रवासात शिवसैनिकांनी शांतता बाळगल्याने शिवसेनेबद्द्लची मते बदलेली आहेत. याचा बाळासाहेबांना नक्कीच आनंद झाला असेल.साहेबांची शेवटची यात्रा शातंतेत व शिस्तबध्दतेत झाली.मोठ्या संख्येने माणसे जमली होती पण कोठेच नांव ठेवणारी घटना घडली नाही.हीच बाळासाहेबांना मोठी श्रध्दांजली ठरली आहे.  


            शिवतीर्थावर जाऊन अस्थी गोळा केल्या आणि अस्थिकलश राज्यभर दर्शनासाठी पाठवण्यात आले तसेच अस्थिकलशाचे विर्सजन शांततेत झाले.

1 comment:

Panchtarankit said...

एवढ्या शांततेत ही अंत्ययात्रा पार पडली:
सारेच कसे सुरळीत व संयमित पार पडले ह्याचे श्रेय मुंबईकरांच्या इतकेच
शिवसैनिक व उद्धव व राज ठाकर्यांना जाते: